सोलापूर, 14 फेब्रुवारी : येत्या 20 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. यात्रा कालावधी 14 ते 26 फेब्रुवारी 2024 असून यात्रेनिमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 16 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना:- पंढरपूरात यात्रे निमित्त अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्यादेवी चौक, शेटफळ चौक मार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्क करावीत. तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळीमार्गे बायपास मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व बिडारी बंगला येथे पार्कींग करावीत.
पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना:- पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूरकडे जाणाऱ्या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका,कॉलेज क्रॉस रोड,कौठाळी बायपास, नवीन सोलापूर नाका मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगाव फाटा पासून मार्गेस्थ होतील..