रत्नागिरी, 14 फेब्रुवारी : येत्या शुक्रवारी, दि. १६ 16 रोजी रथसप्तमीनिमित्त निरामय योगसंस्थेतर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ रुपयांची रोख पारितोषिके आणि चषक देऊन गौरविण्यात येईल. विशेष लक्षवेधी दहा स्पर्धकांनाही आकर्षक चषक देण्यात येईल. स्पर्धा थिबा पॉइंट रोड येथील जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ होणार आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच ते सकाळी ९ या वेळेत स्पर्धा होईल.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन निरामयचे आणि पतंजलीचे आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त योगगुरू विरू स्वामी यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी 9028899412 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले पूर्ण नाव, पत्ता आणि वय याची माहिती पाठवावी, असे सूचित करण्यात आले आहे.