(अमित जाधव)
दिवा : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज पुन्हा अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी केली आहे.
दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाच्या पथकाने आज दिनांक १९ मार्च २०२४ रोजी दिवा प्रभाग समिति, प्रभाग क्रमांक क्रमांक २७ मधील साबेगाव भागातील डी जे कॉम्प्लेक्स येथील ८०× ६० चौ फुटाची प्लिंथ व प्लिंथ वरील कॉलमवर श्री. मनीष जोशी, उप आयुक्त सो. ( परिमंडळ -१) व श्री. अक्षय गुधडे, सहाय्यक आयक्त सो. दिवा प्रभाग समिति यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनखाली यंत्रसामुग्री ( जे सी बी) च्या सहायाने पोलीस बंदोबस्तात तोडण्याची कारवाई करण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक २७ मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करुन काम थांबविण्यात आले.
प्रसंगी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सो यांनी यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहणार आहे असे बोलताना स्पष्ट केले.