उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचा नरेश म्हस्के याना पाठिंबा

0

ठाणे, दि. १४ – उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था महासंघाने ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबद्दल नरेश म्हस्के यांनी महासंघाचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी संवाद साधताना रेल्वे प्रवाशांच्या काही समस्यांबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे नरेश म्हस्के सांगितले.

कल्याण-कसारा रिमोर्डींग बरोबर तिसरा व चौथा मार्ग, महिला विशेष लोकल, महिलांच्या कोचमध्ये आसन व्यवस्था वाढविणे. आसनगाव पूर्वेला ब्रिज बांधणे, ठाणे-कसारा-कर्जत शटल सेवा सुरू करणे. गणेशोत्सवात, होळीला दिवा येथून गाड्या सोडणे. गोल्डन अवरमध्ये अपघाती प्रवाशांवर उपचार करणे आदी कामे यावेळी सूचविण्यात आली.

याप्रसंगी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, सरचिटणीस लता अरगडे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, जितेंद्र विशे, कायदेशीर सल्लागार ऍड. आदेश भगत यांच्यासह संघटनेचे सदस्य आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, युवा सेना शहर अधिकारी सागर जेधे उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech