चंद्रयान-3 लँडिंग साइट ‘शिवशक्ती’ला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाची मंजुरी

0

नवी दिल्ली, 24 मार्च  – चंद्रयान-3 लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ ऑगस्ट २०२३ रोजी केली होती.

त्यानंतर जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने नुकतीच या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांबद्दल तपशीलवार माहिती देणाऱ्या प्लॅनेटरी नामांकनाच्या गॅझेटियरनुसार वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टीम नामांकनाने चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरच्या लँडिंग साइटच्या शिवशक्ती नावाला अधिकृत मान्यता दिली आहे.

भारतीय पौराणिक कथांमधला संयुग शब्द जो प्रकृतीचे पुल्लिंगी (शिव) आणि स्त्रीलिंगी (शक्ती) द्वैत दर्शवतो.

शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे आणि शक्ती आपल्याला ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना देखील देतो, असे मोदी यांनी म्हटले होते.

शिवशक्ती व्यतिरिक्त, मोदींनी त्यादिवशी घोषणा केली होती की, चांद्रयान-2 च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर सोडल्या त्या ठिकाणाला ‘तिरंगा’ म्हटले जाईल. ते म्हणाले होते की, ते भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा म्हणून काम करेल आणि अपयश हे शेवट नसते याची आठवण करून देईल.

संपूर्ण जग भारताच्या वैज्ञानिक भावना, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक स्वभावाचे सामर्थ्य पाहत आहे आणि स्वीकारत असल्याचेही ते म्हणाले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech