( नारायण शेट्टी)
शहापूर – आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही’….ही ओळ आहे कवी सतीश सोळांकुरकर यांच्या ‘आई भाकर करताना…. या कवितेतील.
सोळांकुरकर यांनी सादर केलेली ही कविता आजच्या पिढीच्या भविष्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करावयास भाग पाडते. निमित्त आहे
‘ शब्दवारी’, या कविता संग्रह प्रकाशन सोहळ्याचे.
येथील कवी रवींद्र पानसरे यांच्या पहिल्या ‘शब्दवारी ‘ या कविता संग्रहाचे प्रकाशन कविवर्य सतीश सोळांकुरकर, ,संदेश ढगे व कथालेखिका वसुंधरा घाणेकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शहापुरातील श्री.क्षेत्र गंगा देवस्थान येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यास
शहापूरचे कलाशिक्षक शिरीष पितळे, शंकर गोडबोले, विजय लिटे, सचिन भानगळगावकर , महेंद्र नवधरे, विजय
जोशी, शुभदा ओक, नलिनी जोशी , अरुण अधिकारी ,शंकर पाटील,विशाल गोदडे, डॉ.अजित पोतदार, डॉ.महेंद्र पवार, डॉ.सुहास जोशी,डॉ.सखाराम निचिते, मिलिंद जोशी,शहापूर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्षा अश्विनी अधिकारी ,व्यापारी मंडळाचे माझी अध्यक्ष प्रकाश शहा, संजय श्रीमाळी शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी संदेश उतेकर मान्यवरसह विदयार्थी आणि विद्यर्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवी रवींद्र पानसरे हे मंत्रालयात सेवेत होते तेव्हा पासून त्यांना पोहणे आणि गिर्यारोहण करण्याचा साहसी छंद होता. त्यांनी या वयातही आपल्या छंदाचा उपयोग निवृत्तीनंतर लहान मुलांना आणि तरुणांना शिकवण्यासाठी करत आहेत
. ते उत्तमरित्या गायन करत असून अधून मधून कविता देखील करतात या बद्दल उपस्थितांनी त्यांचे आपासून कौतुक केले.
त्यांनी आता पर्यंत तीनशे पेक्षा अधिक कविता केल्या असून त्यातील काही मोजक्या कवितांचा समावेश या ‘शब्दवारी ‘ संग्रहात करण्यात आला आहे
१९८० सालच्या ग.वि.खाडे विद्यालयातील इयत्ता दहावीतील विदयार्थी आणि विद्यार्थिनीने एकत्र येऊन वर्गमित्र प्रकाशन संस्थेद्वारे हा प्रकाशन सोहळा घडवून आणला. या प्रसंगी कवी सोळांकुरकर यांनी पानसरे यांच्या कवितांचे कौतुक केले. ते उद्याचे एक उत्तम गीतकार होतील असे गौरवोदगार त्यांनी काढले. या प्रसंगी
सोळांकुरकर यांनी आपली
‘आई भाकर करत असताना .. ही कविता सादर केली.त्यातील
‘आपल्याला हवी तशी धग सोसता आली पाहिजे’, ‘झळा लागल्याशिवाय मळा फुलत नाही’ या ओळी रसिकांच्या मनाला भावल्याने त्यांना वाहव्वा मिळाली. त्याच कवितेतील
‘आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही’….ही ओळ उपस्थितांना अंतर्मुख करायला लावणारी होती.
आईने बनवून दिलेली भाकर हि सोपी नसते.. मुलासाठी भाकरी बनवत असतान तीला मोठे कष्ट उपसावे लागते .. जीवनातील आव्हाने हि आपल्याला मजबूत बनवतात त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबळाच्या जोरावर कठोर परीश्रम करा, त्यातच तुमचे यश आहे, आहे आणि सुख आहे अशी शिकवण आई मुलांना देत असते. आईच्या हातची भाकरी खाणारी मुले मुले निराश होत नाही असे कवीना या कवितेतून सुचवावी वाटते.
आजच्या जमान्यात तशी शिकवण मिळत नसल्याने’ आजकाल पिझ्झा बर्गर खाणाऱ्या मुलांच्या नशिबात भाकरीचे सुख नाही’…. या ओळी अंतर्मुख होऊन विचार करायला लावते.या वेळी लेखिका वसुंधरा घाणेकर आणि शरयू आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अशोक सोनवणे यांनी प्रास्ताविकात कवी पानसरे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवले तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा नातू यांनी केले. आभार अरुण पानसरे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक सोनवणे, संदेश ढगे, प्रकाश हजारे, विजय म्हात्रे, माधुरी काबाडी यांच्यासह अनेक मित्र मैत्रिणीने विशेष परिश्रम घेतले.