पुणे:- पुण्याचे निवृत्त साखर आयुक्त श्री. अरविंद रेड्डी यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे आनंद आणि अमर ही दोन मुले आहेत.
त्यांनी ठाणे आणि धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. पुण्यातील भव्य साखर आयुक्तालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते उत्तम खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर “मुंबई मॅरेथॉन”च्या आयोजनाचे काम त्यांनी दोन दशके केले.
उद्या त्यांच्यावर कोरेगाव पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.