कल्याण : निलेश सांबरे यांनी आपण भिवंडी लोकसभा निवडणुक २०२४ लढणार असल्याचे २७ जानेवारी रोजी आपल्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते . यावेळी आपल्या संघटनेची विचारधारा पटणा-या एखाद्या पक्ष्याने जर आपल्याला तिकीट दिले तर आपण त्यांच्यासोबत राहू अन्यथा तिकीट मिळो अथवा ना मिळो आपण ही निवडणूक अपक्ष लढवू असे देखील सांबरे म्हणाले होते. त्यानुसार भिवंडी लोकसभेतून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर काल वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने देखील निलेश सांबरे यांना पाठींबा देणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. याबाबत सोशल मिडीयावर वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतल्या एका पत्रात तसा उल्लेख करण्यात आला आहे. तर प्रकाश आंबेडकर भिवंडीत सभा देखील घेणार असल्याचे समजते .
जिजाऊ विकास पार्टी मधून अपक्ष म्हणुन भिवंडी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे निलेश सांबरे यांनी जाहीर करताच त्यांना अनेक स्तरांतून पाठींबा दर्शविला जात आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातुन गेली १५ वर्ष निलेश सांबरे हे स्व:खर्चाने समाजातल्या दुर्बल आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करत आहेत. केवळ भिवंडी लोकसभाच नाही तर ठाणे , पालघर , रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात आरोग्य , शिक्षण , रोजगार ,शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर त्यांची संघटना काम करते . लाखो रुग्णांना वैद्यकीय मदत , हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत , हजारो महिलांचे सक्षमीकरण यांसारख्या विविध माध्यमांतून त्यांनी जनहिताची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची संघटना ही गावो गावी लोकांच्या मनात घर करून गेली आहे . त्यामुळे सांबरे यांच्यासमोर निवडणूक रिंगणात असलेल्या प्रतीस्पर्ध्याला निलेश सांबरे हे आव्हान जड जाणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. तर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील निलेश सांबरे यांनी पाठींबा दिला आहे.
यावेळी देशाला हेवा वाटेल असे काम आपल्या भिवंडी लोकसभेत आपल्याला करायचे असून भिवंडीचा पॅर्टन हा देशात राबविला जाईल याची खात्री देतो. जिजाऊ संघटनेने केलेली काम पाहिल्यानंतर आपल्याला कोणताही मतदार नाकारणार नाही असा विश्वासही निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे.