अंबरनाथ – येथील महात्मा गांधी विद्यालयातील १० वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. पंक्ती शहा हिच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी अंबर भरारी आणि माजी विद्यार्थी संघाने घेतली असल्याचे अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनी सांगितले. पंक्ती ने दहावीत ९६% गुण मिळवले असून तिचे आई वडील हयात नाहीत. अत्यंत खडतर परिस्थितीत केवळ एकमेव असलेल्या आज्जीच्या साथीने तिने हे अव्वल यश संपादन केले आहे.
माज़ी विद्यार्थी संघ महात्मा गांधी विद्यालय
संस्थेमार्फत कु. पंक्ती शहा हिची भेट घरी घेऊन तिला भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या .अंबर भरारी आणि
माजी विद्यार्थी संघ, महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ तर्फे पंक्तीच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सांगितले.
खडतर परिस्थितीत अभ्यास करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल अंबर भरारी आणि माजी विद्यार्थी संघाचे सुनील चौधरी, मारुती दोरुगडे, सुहास सुभेदार , शैलेश दोंदे, पंकज भालेराव, शैलेश रायकर यांनी तिचा सत्कार केला.
तिची आई मराठी, वडील गुजराती आहेत. मूळ गाव डुमरा मांडवी जवळ, तालुका अबलासा, गुजरात येथील आहे. २०१० साली वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. २०१९ साली आईचे निधन झाले. आईची आई, तिची आजी देवाधर्माचे काम करून दोघींचा संसार चालवत आहे.
पंक्तीला भविष्यात आय टी इंजिनिअर व्हायचे आहे.
आत्ता ११ वी, १२वी ला महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश निश्चित केला आहे.
श्री दत्ता घावट श्री गुणवंत खेरोड़िया डॉ गणेश राठौड़
श्री अमर राणे श्री प्रकाश बाफ़ना श्री विक्रम राठौड़
श्री किशोर जोशी श्री पराग सुले श्री शरद दलाल C A किरण मूठे श्री अनिल खोड़ इतर
आर्थिक सहकार्य करण्यास पुढे आले आहेत.