कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 12 फुटी भव्य पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण…

0

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ५/ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकातील पूर्णाकृती पुतळयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी अनावरण होत आहे.

महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय (५/ड प्रभाग) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रा अंतर्गत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून त्याचे ८० % काम पुर्ण करण्यात आलेले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे रु. १६ कोटी ८५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

प्रदर्शन हॉल, होलोग्राफी शो, याठिकाणी प्रदर्शन हॉल, वाचनालय…

प्रशासकीय दालन, कन्सेप्ट थीम, होलोग्राफी शो, वाचनालय, उद‌्वाहन, प्रसाधनगृह या सुविधा असून पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्हास्तरीय समितीची मान्यता झालेली आहे.

या कामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत *”महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोईसुविधांचा विकास” व “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकासयोजना” तसेच महापालिका निधीतुन खर्च करण्यात येत आहे.

12 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांझ धातूचा भव्य पुतळा…

सदर स्मारकाच्या भूखंडाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १३६५ चौ. मी. असून स्मारकाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ५४० चौ. मी. एवढे आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ८ फूट उंचीचा सुशोभित चौथरा बांधून त्यावर १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर, याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्य जीवनावर आधारित विविध घटनांचे प्रोजेक्टरच्या माध्यमातुन प्रक्षेपण, थीम व्यवस्था, वाचनालय होलोग्राफी शो, तैलचित्रे व म्युरल्स इ. सोईसुविधा विविध कक्षात निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तसेच, वृध्द व अपंग व्यक्तींसाठी उद‌्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायं. ०६.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech