ठाणे – हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊस मध्ये रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 8 च्या सुमारास एक घटना घडली. संध्याकाळी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्षीय लहान मुलाचे पाण्यात बुडताना प्राण वाचवले.
क्लब हाऊस मधील तरण तलावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी सातच्या बॅचला सभासदांची गर्दी झाली. या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हे देखील होते. तरण तलावात मुक्त विहार करताना, सुमारे आठच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचे राजेश शेटकर यांच्या लक्षात आले. त्या मुलाकडे कोणाचेही लक्ष नव्हते असे दिसून आले. पाण्यात हा मुलगा खाली तळाला जात आहे हे लक्षात येताच पत्रकार राजेश शेटकर लगबगीने त्या मुलाच्या दिशेने जाऊन त्याला पाण्यातून वर काढले, दोन्ही हाताने मुलांना वर घेऊन जोरात आवाज दिला हा मुलगा कोणाचा आहे. त्यावेळी सगळ्यांचे लक्ष राजेश शेटकर यांच्याकडे गेले मोबाईल मध्ये व्यस्त असलेल्या त्या मुलाच्या वडिलांना मुलगा कधी पाण्यात पडला आहे त्यांना लक्षात आलं नाही. आपला मुलगा पाण्यात पडलेला पाहून लगेचच ते शेटकर यांच्याकडे गेले. आणि तिथेच त्या मुलाची आई देखील पोहण्याचा सराव करत होती. तीसुद्धा त्वरित जवळ आली. आपल्या मुलाला पाण्यात बघून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या मुलाचे प्राण राजेश शेटकर यांनी वाचवले याची जाणीव त्यांना झाली आणि दोघांनीही राजेश शेटकर यांचे आभार व्यक्त केले. क्लब हाऊस च्या सुरक्षारक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.