ठाणे,कल्याण,भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज पासून ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

0

ठाणे : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील २३- भिवंडी, २४- कल्याण व २५ – ठाणे या तीन मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित तीनही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना २३- भिवंडी, २४- कल्याण व २५ – ठाणे या तीनही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

लोकसभेच्या या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २६ एप्रिल २०२४ पासून सुरुवात होईल. ३ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. दिनांक ४ मे २०२४ रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर ६ मे २०२४ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. दिनांक २० मे २०२४ रोजी मतदान होईल. तर जून ४ २०२४ रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदार संघाचे कार्यालय उप विभागीय अधिकारी कार्यालय, भिवंडी, एस टी स्टँड समोर, आग्रा रोड, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे आहे.
24 कल्याण लोकसभा मतदार संघाचे कार्यालय
सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, जलतरण तलावाजवळ, डोंबिवली पूर्व, ता. कल्याण, जि. ठाणे .
25 ठाणे लोकसभा मतदार संघाचे कार्यालय
अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे, जि. ठाणे, येथे आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech