ठाणे – केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक म्हणून आपलीही महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी आहे. अत्यंत कठीण वाटणा-या या परीक्षांना नेमकं कसं सामोरं जायचं…? अभ्यास नेमका कधी, केव्हा आणि कसा सुरु करायचा…? असे अनेक प्रश्न पडतात किंवा अशा प्रश्नांची भिती वाटत असली तरीही सहज आणि सोप्या पद्धतीने केलेल्या अभ्यासाद्वारे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळतं. अशी खात्री स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना झालेली आहे. म्हणूनच शैक्षणिक दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. राजेश मोरे व रुचिता मोरे यांनी केले आहे.
रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४
वेळ : सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ : खुला रंगमंच, कचराळी तलाव, ठाणे महानगरपालिकेसमोर, ठाणे.