आज होळी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे होळीची पूजा करून होलिकामातेला मनोभावे वंदन केले. तसेच होळी पेटवून समाजातील वाईट गोष्टींचा नाश करून सर्वांना सुख समाधान मिळावे एवढेच मागणे होलिकामातेकडे मागितले.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.