मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने अबकी बार ४०० पारचा नारा दिला आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या ५ याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने देशातील सुमारे ९० टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली. यात भाजपने १०० विद्यमान खासदारांचे तिकीट कापले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ९० टक्के उमेदवारांची नावे जाहीर केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे ४०० पारचे लक्ष्य आहे. यासाठी भाजपने योजना आखली आहे. या योजनेसाठी भाजपने १०० खासदारांना झटका दिला आहे. भाजपने आगामी लोकसभेसाठी १०० विद्यमान खासदारांचे तिकीट कापले. १०० विद्यमान खासदारांवर निवडून येण्याबाबत साशंकता असल्याने भाजपने खासदारांना दुसरी संधी दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या १०० खासदारांना मोठा दणका बसला आहे.