दिवा (अमित जाधव) : दिवा शहरामध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले मुंब्रादेवी कॉलनी येथील आशीर्वाद हॉस्पिटल यांच्याकडे आरोग्य विभागाची नोंदणी परवाना नसताना देखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून हे हॉस्पिटल दिवा शहरात राजरोसपणे सुरू होते.
आपतकालीन प्रसंगी रुग्णालया जवळ रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाची गाडी पोहचू शकत नव्हती. संबंधित विषयाची दखल घेत विकास जगताप यांनी सदर हॉस्पिटल संबंधी तक्रार दाखल केली. परंतु तक्रारीवर कोणतेही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येतास विकास जगताप यांनी मुंबई आझाद मैदान येथे उपोषण करून बेकायदा असलेले आशीर्वाद हॉस्पिटल बंद करण्यास भाग पाडले.
शासनाची फसवणूक करून गोरगरीब रुग्णांना लुटणाऱ्या व रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या हॉस्पिटल विरोधात कारवाई होणे गरजेचे होते. सदर बेकायदा असलेले आशीर्वाद हॉस्पिटल बंद झाल्यामुळे दिवा शहरांमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिव्यातील अन्य विनापरवानगी सुरू असलेली खासगी रुग्णालये पालिकेच्या रडारवर…
दिव्यातील अनेक बेकायदा रूग्णालये पलिकेच्या रडार वर असून लवकरच ठोस कारवाई करण्यात येईल असे ठाणे महापालिका आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.