अंबरनाथ मध्ये भव्य कलादालन , सेंट्रल पार्क उभारणार… डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

0

अंबरनाथ – अंबरनाथ,डोंबिवली , कल्याण या भागातील साहित्यिक कलाकार शिल्पकार चित्रकार लोक कलाकार इत्यादी कला आणि साहित्याची संबंधित व्यक्तींची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी यावेळी संवाद साधला.
या सभेस अंबरनाथ शहरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली. यामध्ये महाराष्ट्र फाउंडेशन महाराष्ट्र गौरव इत्यादी पुरस्कार प्राप्त साहित्यिक किरण येले, पत्रकार राजेश जगताप शरद पवार, कलादिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले अमेय भालेराव, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश सुभेदार, ज्येष्ठ अभिनेत्री इरावती लागू, संध्या कांबले सारेगामापा लिटिल चॅम्प्स च्या रंगभूषाकार अनिता कानवडे, महाराष्ट्राचे निवेदक अमेय रानडे, नृत्य कलाकार कोळी, शिल्पकार जितू थिटे, चित्रकार सुभाष शेगोकर, अभिनेत्री तपस्या नेवे, अभिनेता संतोष गोरे, डॉ वसंत महाजन, प्रसाद मुदवदेकर ,लेखक प्रशांत असलेकर, प्रवीण कारखानीस , कवी नारायण टीकम,संकेत जाधव , देवेंद्र जैन कथाकार स्वाती पाटील अभिनेता जगदीश हडप इत्यादी अनेक मंडळी उपस्थित होती.

सभा ठीक साडेआठ वाजता सुरू झाली.उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पोहोचण्यास थोडा अवधी होता म्हणून या सभेची सुरुवात कविता किस्से अभिवाचन अशा पद्धतीने सूरवात करण्यात आली आणि तर उत्तर ही मेहफिल रंगतदार होत गेली. दहा वाजता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आल्यावर त्यांनी ही लोककला आपल्याला ऐकायची होती अशी भावना व्यक्त केली. उपस्थित लेखक,कलाकारांच्या आमच्या कडून असलेल्या अपेक्षा काय आहे अशी चौकशी केली त्यावर उपस्थितांनी आणलेली निवेदने त्यांना सादर केली. ही सर्व वाचून झाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले की ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरे कलादालन च्या धर्तीवर अंबरनाथ मध्ये एक कलादालन करु . ज्यामध्ये मागणी झाल्याप्रमाणे चित्रकारांसाठी एक वेगळे झालं असेल.शिल्पकारांसाठी एक स्वतंत्र दालन असेल. रंगकर्मीसाठी गायकांसाठी दालन असेल. त्याचप्रमाणे त्यांनी जाहीर केले की शहरात एक भव्य सेंट्रल पार्क असेल जे सर्व नागरिकांना विरंगुळ्यासाठी तसेच जॉगिंग , वॉकिंग ,योगा इत्यादी शारीरिक स्वास्थ प्रकारांसाठी उपलब्ध होईल. यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला .त्याही वेळेस खासदार श्रीकांत शिंदे यांनी श्री सुनील चौधरी यांना सूचित केले की आजच्या सुंदर कार्यक्रमाप्रमाणेच लवकरच अशीच एखादी मैफल आयोजित करा. त्या मैफलीस मी संपूर्ण वेळ हजर राहीन.
शिवसेना प्रवक्ता किरण सोनवणे ,आमदार डॉ बालाजी किणीकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन दत्ता घावट , डॉ गणेश राठौड़ गुणवंत खेरोदिया , गणेश चिपलुनकर निखिल चौधरी यांनी केले .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech