निर्धन रुग्णांच्या जीवांचे रक्षण करणारा रुग्णदूत- मंगेश चिवटे
समाजातील गोरगरीब,निर्धन व निराधार व्यक्ती जी हातापोटावर जीवन जगून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करत असते.दुर्दैवाने जर अशा व्यक्तीला एखादा मोठा आजार जडल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली,तर तो हॉस्पिटलचा खर्च कसा उचलेल? ‘अठरा विश्वे दारिद्र्य ‘ असल्याने आपल्या दुर्धर आजारपणामुळे त्या व्यक्तीस पैश्याअभावी अखेर प्राण गमवावाच लागेल.त्याला पर्याय नाही.इतकेच नव्हे तर,दारिद्र्यामुळे अशा असंख्य रुग्णांना दैनंदिन जीवनात आपले प्राण गमवावे लागलेत.या पार्श्वभूमीवर कोणीही रुग्णसेवेपासून वंचित राहू नये.तसेच पैश्याअभावी कोणा गरीबाचे प्राण जाऊ नयेत,या उद्देशाने राज्याचे पूर्वाश्रमीचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भगव्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे-कोपरी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली,अन् त्याद्वारे जणू रुग्णसेवेचा एकप्रकारे शुभारंभच झाला.
दरम्यान,राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या धर्तीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मंगेश चिवटे यांनी ना.एकनाथजी शिंदे यांच्या समोर मांडला.सदर प्रस्तावातील संकल्पना शिंदेसाहेबांना मनस्वी आवडल्याने त्यांनी त्यास तात्काळ मंजुरी दिली.मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातल्या गोरगरीब,गरजू व
आर्थिकदृश्या दुर्बल घटकांसाठी जणू आरोग्य सेवेची कवाडंच उघडली.इतकेच नव्हे तर,पुढच्या काळात १७ नोव्हेंबर,२०१८ रोजी दादर येथील शिवसेना
भवनमध्येही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची उभारणी करण्यात आली. याचं श्रेय मंगेश चिवटे यांनी
तनमनधनाने केलेल्या रुग्णसेवेला जातं.पूर्वाश्रमीचे नगर विकास मंत्री तथा आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रेरणा अन् कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याने मंगेश चिवटे यांच्या रुग्णसेवेला अधिक चालना मिळून, निराधार रुग्णांना त्यांचे महागडे ऑपरेशन्स करणं सुकर झालं आहे. वास्तवात हीच खरी मंगेश चिवटे यांच्या नि:स्पृह सेवेची फलश्रुती होय.
रुग्णदूत मंगेश चिवटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशिर्वाद देताना,त्यांचा अल्प परिचय करून देणं क्रमप्राप्तच ठरते.मंगेश चिवटे यांचा जन्म १५ जून,१९८८ रोजी स्वातंत्र्य सेनानी साथी मनोहरपंत चिवटे(आजोबा) यांच्या देशप्रेमी घराण्यात झाला.अन् जणू राज्यातील गोरगरीब,निराश्रित लोकांच्या आरोग्याची कणव असलेला रुग्णदुतच उदयास आला.चिवटेसरांचे वडील नरसिंह चिवटे हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून जनमानसाला परिचित आहेत,तर आईचे नाव सौ.मंदाकिनी चिवटे. मंगेश चिवटे यांच्या सुविज्ञ पत्नीचे नाव सौ.शिल्पा चिवटे आणि एक पुत्र व पुत्री असा त्यांचा परिवार आहे.चिवटे यांच्या पत्नी सौ.शिल्पा चिवटे यांची भक्कम साथ मंगेशसरांना लाभत असल्याने त्यांना सातत्याने सामाजिक कार्यात यश प्राप्त होताहे.म्हणूनच म्हणतात ना,”हर कामियाब
इंसान के पीछे औरत का हाथ होता हैं”.
मंगेश चिवटे यांची शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात ओळख असायची.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी.कॉलेज मध्ये झाले.त्यांनी मराठी विषयात एम.ए. करून नंतर बी.एड.केलं.याशिवाय चिवटे यांनी पत्रकारिता विषयात देखील पदवी संपादन केली.इतकेच नव्हे तर,मुंबईच्या के.सी. कॉलेज मध्ये लॉ फॅकल्टीची दोन वर्षे पूर्ण करून आत्ता ते शेवटच्या वर्षाला अपियर आहेत.छंद म्हणून ते गड-किल्ल्यांचा प्रवास करत या विषयात संशोधन करत आहेत.आतापर्यंत
चिवटेसरांनी ५० गड किल्ल्यांना भेटी दिल्या असून,पन्हाळगड ते पावनखिंड हा प्रवास ते गेल्या १० वर्षांपासून सातत्याने करत आहेत,याचा आम्हाला अभिमान आहे.खरं तर,चिवटेसर हे गाढे शिवभक्त असून,शिवकालीन इतिहासाचे सच्चे अभ्यासक आहेत.सुरुवातीच्या काळात चिवटे यांनी स्टार माझा,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी,साम टी व्ही,आय बी एन लोकमत या वाहिन्यांमध्ये विविध पदांवर काम केले.सुमारे २०० हून अधिक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.२६/११ रोजीच्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ल्याच्या थरारक प्रसंगाचे त्यांनी कव्हरेज केलं.वास्तवात हेच खरं त्यांच्या साहसीवृत्तीचं द्योतक होय.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची महती व त्याद्वारे केलेलं रुग्णसेवेचं लोण राज्यासह बेळगाव,केरळपर्यंत पोहोचणं हे चिवटेसर अन् त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमाचे फलित आहे.त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य महाशिबिरे आयोजित करून लाखो गरजू लोकांना मोफत औषधोपचार करण्यात आला.तसेच नेत्रचिकित्सा शिबिरे भरवून सर्वधर्मीय गरजू लोकांना मोफत चष्मांचे
वाटप करून त्यांना नवदृष्टी प्रदान केली.आज राज्यात सुमारे ५००० रुग्णसेवक
तनमनधनाने रुग्णसेवा करून गोरगरिबांच्या जीवांचे रक्षण करत आहेत.महत्वाचे म्हणजे कोरोना काळात हे मदत कक्षाचे कार्यालय लोकांच्या मदतीसाठी २४ तास सुरू ठेवण्यात आले होते.त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका,रेमडीसिव्हर इंजेक्शन अन् हॉस्पिटलात बेड मिळण्यास मदत झाल्याने हजारों रुग्णांचे प्राण वाचले.अशा प्रकारे *रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा* हे ब्रीद चिवटेसर अन् त्यांच्या टीमने सार्थक करून दाखविले.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अन् खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चिवटेसर व त्यांच्या जांबाज टीमचे तोंडभरून कौतुक केलं.
रुग्णदुत मंगेश चिवटे यांची रुग्णसेवेतील नेत्रदीपक कामगिरी पाहून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी
चिवटे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख अन् विशेष कार्यकारी अधिकारी अशी दोन महत्वपूर्ण पदांवर नियुक्ती केली.म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा कार्यभार रामहरी राऊत व ज्ञानेश्वर धुळगंडे यांच्याकडे सोपविण्यात आला.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख या नात्याने चिवटे सरांनी गेल्या १ वर्ष ११ महिन्यात ३२००० हून अधिक रुग्णांचे ख्यातनाम हॉस्पिटल्समध्ये महागडे ऑपरेशन्स मोफत करून देत त्यांना नवजीवन प्रदान केले.या रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून सुमारे २६७ कोटी,५१ लाख रुपयांचे
अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.याशिवाय डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे सुमारे ५००० लहान बालकांच्या हृदयावरील
छिद्राचे ऑपरेशन ख्यातनाम ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात आले.आज ही मुलं मोकळा श्वास घेत सुदृढ जीवन जगत आहेत.उल्लेखनीय गोष्ट म्हणजे डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे कोरोना काळात हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या
ने-आणसाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अद्यावत सुविधांयुक्त
रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.ह्या सर्व गोष्टींचे नियोजन चिवटेसरांकडे असल्याने,रुग्णसेवेच्या प्रगतीचा आलेख
दिवसंदिवस मोठ्या गतीने वाढतच चालला असल्याने याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.आता तर,चिवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली अन् राज्याचे कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात *आरोग्य संवाद यात्रा* काढण्यात आली आहे.त्यामुळे राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांशी अन् स्थानिक नेत्यांशी आरोग्यविषयक संवाद साधून पुढील रणनीती आखता येऊ शकेल.
केवळ रुग्णसेवेतच चिवटे सरांनी आघाडी मिळविलेली नाही,तर गडकिल्ल्यांचे भ्रमण करणं अन् त्याचा सखोल अभ्यास करणं हा देखील त्यांचा आवडीचा विषय आहे.त्याचाच एक भाग म्हणून डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि चिवटे बंधूंचे मुक्ताई गारमेंट,करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षांपासून किल्ले रायगडवरील
शिवछत्रपतींच्या मूर्तींना *अखंड पुष्पहार अर्पण सेवा* सुरू केली आहे.या नाविन्यपूर्ण व अभूतपूर्व उपक्रमाची कोल्हापूरच्या छ्त्रपती संभाजी महाराजांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.वास्तविक पहाता,शिव छत्रपतींच्या ऐतिहासिक वास्तूंचे नित्यनेमाने पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करणे,हे सर्वाधिक मोठं पुण्यकर्म असून,ते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मंगेश चिवटेसर यांच्या हातून होताहे,याचा आम्हा
शिवप्रेमींना सार्थ अभिमान आहे.
अशा अनेक सामाजिक चळवळीत नेत्रदीपक कार्य केल्याबद्दल रुग्णदुत मंगेश चिवटेसर यांचा राज्यातील अनेक सेवाभावी संस्था, संघटनांनी पुरस्कार-सन्मानपत्र देऊन गौरव केला.अत: कर्तव्यदक्ष,प्रामाणिक,निष्ठावान,उच्च विद्याविभूषित,धाडसी,कठोर परिश्रम व चिकाटीने सामाजिक कार्यात झोकून घेणारे,गोरगरिबांची कणव असणारे अन् स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या जीवांचे रक्षण करणारे रुग्णदुत आदरणीय मंगेश चिवटेसर यांचे वाढदिवसानिमित्त राज्यातील समस्त रुग्णसेवक,डॉक्टर्स,वैद्यकीय सहाय्यक यांच्यातर्फे अभिनंदन अन् भगव्या शुभेच्छा.आपणास सुदृढ,निरोगी व आरोग्यदायी जीवन मिळून गोरगरीब लोकांच्या आरोग्यसेवेसाठी मोठं बळ मिळो,अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना!🙏
– रणवीर राजपूत,ठाणे.
*निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क,
मंत्रालय*
(मो.न.९९२०६७४२१९)
………………………………..