गुरु पौर्णिमेनिमित्त कवी एडवोकेट रुपेश पवार यांनी ही अभंग काव्यरचना केली आहे. त्यात त्यांनी श्री गणेश देवतेला सद्गुरु मानून हा अभंग लिहिला आहे. “जय सद्गुरू”
अंतरंगी असे मूर्ति
नादमय जग ओमकाराचा धर्म
दिसे मज गणपती सर्वकाळ
काळा वर तो आरुड
काळाला या धरून
म्हणोनि या मूषक स्वर गणपती
तो गुरु, सदगुरु, त्रिदेव
असे ज्ञानाचा विश्वंभर
स्मरण शक्तीत राहे गणपती
असू द्या हे ध्यानात
रूपेश म्हणे तो आत्मरुप
अंतरंगी असे मूर्ति गणपती
—————
रुपेश पवार ( कवी)