मास्को : मास्कोच्या पश्चिमेला असलेल्या क्रोसक सिटी हॉलवर बंदुकधारी घुसले आणि त्यांनी हल्ला केला.
यासोबतच स्फोटांचेही आवाज झाले. त्यामुळे कॉन्सर्ट हॉलमधून आगीचे लोळ उसळताना दिसले. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला.
त्याचवेळी बेछूट गोळीबार सुरू केल्याने घटनास्थळी मृत्यूचा खच पडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
रशियाची राजधानी मास्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला.
हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ४० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात मोठी जिवीत हानी झाली असून, मृतांचा आणि जखमींचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
त्यामुळे मृतांचा आकडा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.