नई दिल्ली – कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. कथित मद्य धोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते. पण अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली.
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या कारभाराचे काय होणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. यावर आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा केला. यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरूवात केली आहे.