तेलींच्या जाण्याने भाजपवर कोणताही परिणाम नाही !
सिंधुदुर्ग – राजन तेली आज माजी आमदार म्हणून मिरवत आहात ही नारायण राणेंचीच कृपा आहे. त्यांच्यासोबत गेलात म्हणूनच त्यावेळी आमदार झालात. त्यामुळे राणे परिवारावर बोलण्याची पुन्हा चूक करू नका अन्यथा.. त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सावंतवाडी येथे राजन तेली यांना दिला.
दरम्यान भाजप सोडून ठाकरे शिवसेनेत गेलेले राजन तेली हे एकटेच गेले आहेत. त्यांच्यासोबत कोणताही भाजपचा कार्यकर्ता गेलेला नाही. त्यामुळे त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम होत नाही, असेही ते म्हणाले. परब यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. परब पुढे म्हणाले, या ठिकाणी काल ठाकरे शिवसेना प्रवेशादरम्यान राजन तेली यांनी आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यांच्यावर आपण गेलो ही चूक झाली असल्याने वक्तव्य केले होते. परंतु वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांच्या जाण्यामुळे माझ्या पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ते एकटेच ठाकरे सेनेत गेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
दुसरीकडे त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करू नये, राणे यांच्यासोबत ते काँग्रेसमुळे गेल्यामुळे त्यांना आमदारकी मिळाली म्हणून ते आज माजी आमदार म्हणून मिरवत आहेत. ही सगळी राणे यांची कृपा आहे. परब यांनी यावेळी आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहोत, असा पुन्हा एकदा दावा केला. महायुतीचा अद्याप पर्यंत उमेदवार जाहीर झालेला नाही. तरीही पक्षाकडे आपली मागणी कायम आहे. आपल्याला तिकीट मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.