महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी…

0

* कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..

* ‘ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.

पुणे : पुणे १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे या उपस्थित होत्या हा कार्यक्रम महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेचे प्रांगण कर्वेनगर येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना नीलम ताई गोर्हे म्हणाल्या ‘उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण देशात मुलींची संख्या अग्रगण्य आहे त्यासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील संपूर्ण देशात मुलींचे विशेष योगदान दिसून येते .स्त्री- पुरुष समानता या विषयावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज असून मुलींचा जन्मदर राज्यात चिंतेचा विषय आहे मात्र कोकणात मुलींचा जन्मदर हा बरोबरीने दिसून येतो.

महायुती सरकारच्या वतीने गेल्या अडीच वर्षात महिलांविषयी लहान मुलीं विषयी लेक लाडकी योजना असो,बालसंगोपन योजना असो,लाडकी बहीण योजना असो या योजनानमुळे महिलांचा आर्थिक विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात प्रगती झालेली निश्चितच दिसून येते लाडकी बहिण योजनेमुळे गरीब घरातील मुलींच्या शिक्षणात निश्चितच प्रगती झाल्याचं भविष्यात आपल्याला दिसून येईल, तसेच या योजनांमध्ये अनेक संस्थांकडून जनजागृती होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

मुलींच्या विषयी बोलताना उपसभापती नीलम ताई म्हणाल्या लैंगिक छळाचा घटनेमध्ये मुलींनी हिम्मत दाखवणे आवश्यक आहे मुलींनी हिम्मत दाखवल्यास निश्चितच न्याय मिळवायला अधिक मदत होईल असे सांगत त्यांनी अशा घटनात प्रतिकाराच्या प्रसंगांची ऊदाहरणे दिली. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संस्थाचालकांचा विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता तसेच योगिता आपटे अनुराधा सहस्रबुद्धे या सहभागी होत्या . या कार्यक्रमाचे आयोजन श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे यांच्या नेतृत्वात रेनबो फाऊंडेशन तर्फे करण्यात आले होते .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech