नवी मुंबई : नवी मुंबई येथील प्रभाग क्रमांक १८ मधनू वैद्य नालातून मोठया प्रमाणात पावसाळी पाण्याचा विसर्ग होतो, पुर नियंत्रण करण्याकरीता हा नाला अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु हा वैद्य नाला अत्यंत कमकुवत झाला असल्याने तेथील स्लॅब तुटला पडला होता, त्यामुळे हा नाला पूर्णपणे उघडा असल्यामुळे स्थानिक नागरिकांना डासांचा ब दुर्गंधीचा त्रास होत होता. नागरीकांच्या आरोग्याच्या व स्व्छता दूत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नालां बांधण्यासाठी मा.नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी अविश्रांत पाठपुरावा केला. यामुळे आता नाला नव्याने बांधण्याचे कामास सुरुवात झाली. याची पाहणी करताना मनीषा परदेशी, वैशाली शाह,प्रीती,पाटकर भाऊ व स्थानिक उपस्थित होते. स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.