रतन टाटा यांना भारतरत्न देण्यासाठी पाठपुरावा करणार – खा. श्रीरंग बारणे

0

पुणे : पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्स आणि राज्यातील टाटा कंपनीच्या इतर उद्योगामुळे महाराष्ट्र देशात नेहमीच उद्योग क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कामगारांप्रती आणि सामाजिक उत्तरदायित्व निभवण्यामध्ये देखील टाटा कुटुंबीय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यामध्ये रतन टाटा यांचे योगदान मोठे आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. भारतात उद्योग विश्वाची पायाभरणी टाटा कुटुंबीयांमुळे झाली आहे. आज पुणे जिल्ह्याचा औद्योगिक पट्टा जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो.

यावेळी खा. बारणे बोलत होते, आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम पिंपरी चिंचवडने सुरू केलेले सामाजिक उपक्रम उल्लेखनीय आहेत. यामध्ये रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी मागणी महत्वपूर्ण आहे. मी खासदार या नात्याने केंद्र सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. आमदार उमा खापरे आणि टीम पिंपरी चिंचवडचे समन्वयक जयदीप उमा गिरीश खापरे यांनी स्वर्गीय रतन टाटा यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे यासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत शनिवारी रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech