कल्याण कुणाचे? हायव्होल्टेज लढत

0

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली. डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असतील, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असं फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली उमेदवार यादी जाहीर केली असताना, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. शिवसेना आणि भाजपमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरु होती, अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करुन, कल्याणच्या जागेचा तिढा सोडवला. आता श्रीकांत शिंदे यांची लढत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी होणार आहे.

राज्यातील महत्त्वाच्या लढतीपैकी एक लढत म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं आहे. वैशाली दरेकर यांनी यापूर्वी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. वैशाली दरेकर 2009 मध्ये लोकसभेच्या रणांगणात उतरल्या होत्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech