सेवक संचात शिक्षकांची वाढीव पदे देऊ – दादा भुसे

0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. तेव्हा शिक्षणमंत्र्यांनी सेवक संचात वाढीव पदे देण्याचे आश्वासन महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिले. महामंडळाचे पदाधिकारी सुभाष माने, अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांबरोबर १५ दिवसांत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. एक नोव्हेंबर २००५ च्या अगोदर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वित्त विभागाबरोबर लवकरच बैठक घेऊ. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून सेवक संचात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शिक्षकांची पदे कमी झाली.

मात्र, ज्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, त्या शाळेला वाढीव शिक्षक पदे दिली नाहीत. ती शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या सेवक संचात मिळावीत. कला, क्रीडा, कार्यानुभव ही पदे सेवक संचात स्वतंत्र दाखवावीत. शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मान्यता मिळाव्यात. चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचारी पूर्वीप्रमाणे वेतनावर भरण्यास परवानगी मिळावी. वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे, अशा मागण्या मुख्याध्यापक महामंडळाने केल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech