पैठण- भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पैठणमध्ये ३१ मार्च रोजी नाथषष्ठी सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त टाळ मृदुंगाचा गजर करत आणि भानुदास एकनाथांचा जयघोष करत राज्यभरातून वारकऱ्यांच्या पायी दिंड्या पैठणपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. पाचोड- पैठण मार्गावर ठीक ठिकाणी वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांकडून फराळपाण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक गावांत रात्री दिंड्या मुक्काम करत असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी दिंड्या आपल्या मार्गाने निघत असल्याने ग्रामस्थदेखील आनंदाने वारकऱ्यांची सेवा करत आहे.