मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीचा महिला पत्रकारासोबत जोरदार वाद

0

मेलबर्न : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी निमित्त विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. मेलबर्नला दाखल होताच एअरपोर्टवर विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. विराट कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? या वादाचे नेमके कारण आता समोर आले आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो पत्रकारांशी झालेल्या वादाचा मुद्दा संपूर्ण ऑस्ट्रेलियात गाजला. ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीवर टीका करत आहे. तसे विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध याआधीपासून चांगले नाही आहे. याआधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सुद्धा विराटचा तिथल्या मीडियासोबत वाद झाला आहे. पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे.

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात 26 डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. टेस्ट सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिसबेन टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे.आता यांनतर मेलबर्नमध्ये मालिकेत कोण आघाडी घेतो? त्याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे. मेलबर्नमध्ये दाखल होताच विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराट कोहलीच्या मुलांचे फोटो काढले त्यावरुन हा दिग्गज क्रिकेटर त्या महिला पत्रकारासोबत बराच वेळ वाद घालत होता. विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका महिला पत्रकाराशी वाद घालताना दिसतो. विराट बोलत असताना खूप रागात दिसत आहे. यानंतर विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना सांगतो की, तुम्ही लोक माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. पण चॅनल7 ने दावा केला आहे की, त्यांच्या मुलांचे कोणतेही फोटो क्लिक केलेले नाहीत किंवा त्यांचे व्हिडिओ बनवले गेले नाहीत. विराट कोहलीने सर्वांना सांगितले की त्याला प्रायव्हसीची आवश्यकता आहे आणि त्याच्या परवानगीशिवाय कोणीही त्याच्या मुलांचा व्हिडिओ बनवू शकत नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech