मुंबई : आदिती तटकरे यांनी आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे, राज्यात सरकारने गेल्या वर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचा अनेक महिलांनी लाभ घेतला. आता या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. ज्या महिला या योजनेत बसत नाहीत, मात्र तरी देखील लाभ घेत आहेत त्यांच्या आर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होऊ शकते. अर्जाची पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार की नाही यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये. योजनेचं मुल्यमापन करणं यात नवीन काही नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. आदिती तटकरे यांच्या या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलं आहे. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी आमचं सरकार आल्यास महिलांना २१०० रुपये लाभ देऊ असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशनानंतर महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे