मुंबई : भारताच्या या ऐतिहासिक विजयाची वैष्णवी शर्मा स्टार ठरली. जिने या सामन्यात हॅटट्रिक घेत ५ धावांमध्ये ४ विकेट्स दिले.१९ वर्षीय वैष्णवीने महिला टी२० विश्वचषक २०२५ मध्ये पदार्पण करताना मलेशिया संघाचे अवघ्या ५ धावांमध्ये ५ बळी घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, तिने पदार्पणातच हॅटट्रिक घेत अप्रतिम कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली. तिने नवा इतिहास रचला आणि जगातील मोजक्या गोलंदाजांच्या यादीतही आपले स्थान निर्माण केले. १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने अवघ्या १७ चेंडूत हा सामना जिंकला.
या सामन्यात वैष्णवी शर्मा हिने कमाल करून दाखवली. वैष्णवीच्या भेदक माऱ्यामुळे मलेशिया संघाचा डाव अवघ्या ३१ धावांवर आटोपला. मलेशिया विरुद्धच्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक सामन्यात डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माची जादू दिसून आली.वैष्णवीने या सामन्यात तिने ४ षटके टाकली आणि केवळ ५ धावा देत ५ बळी घेतले. यावेळी तिने हॅटट्रिकही पूर्ण केली. १४ व्या षटकात तिने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच दमदार दुहेरी कामगिरीसोबतच तिने नवा विक्रम प्रस्थापित केला.