पुणे : विधानसभा निवडणूक आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावर गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन पुकारले होते. दरम्यान, ठाकरे यांनी आज बाबा आढाव यांची भेट घेतली. त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान आज, शनिवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर आत्मक्लेश आंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुषमा अंधारे हे देखील उपस्थित होते.
दरम्यान शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली. बाबा आढावा आत्मक्लेश आंदोलनासंबंधी बोलतांना शरद पवार म्हणाले की, राज्यात आणि देशात पैशांचा वापर करून विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे. जे लोक संसद आणि संसदेच्या बाहेर भेटले त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झालीय. पाच लोकांमध्ये चर्चेचा सूर असून बाबा आढाव यांनी पुढाकार घेवून त्यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरु केलंय. बाबा आढाव यांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. लोकांनी देखील उठाव केला पाहिजे, अन्यथा लोकशाही धोक्यात येईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
बाबा आढावा आत्मक्लेश आंदोलनासंबंधी बोलतांना यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, आज जिंकलेले आणि हरलेले देखील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला भेटी देत आहे. कारण, निकालावर जिंकलेल्यांचा विश्वास नाही आणि हरलेल्यांचा आपण हरलो तरी कसे, यावरही विश्वास नाही, असं ठाकरे म्हणाले. ईव्हीएमवर विरोधात बाबा आढाव यांचे मागील तीन दिवसांपासून पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आज शरद पवार, अजित पवार यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली.