विद्यार्थिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकून; लॅपटॉप घेऊन चोरटे पसार

0

ठाणे : यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला लुटण्याचा प्रकार घडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीच्या जवळची लॅपटॉपची बॅग घेऊन हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात टाकण्यात आलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे तरुणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

कल्याणच्या लोकग्राममध्ये राहणाऱ्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी अंधेरीवरून आलेल्या तरुणीवर लोकग्रामच्या मोटरसायकल पार्किंगमध्येच ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला. तिच्या जवळील लॅपटॉप लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीच्या अंगावर कास्टिक सोडा टाकण्यात आला. तरूणीला यामुळे कोणतीही गंभीर इजा जरी झाली नसली तरी तिची ओढणी आणि कपडे मात्र ज्वलनशील पदार्थामुळे जळाले. कल्याण पूर्वेतील लोकग्राम पार्किंग प्रभाग परिसरात ही घटना घडली. या तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech