सिंधुदुर्ग – काँग्रेसच्या कोठ्यावर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करू नये. स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली आहे ते आधी पहावे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठ्यावर तुम्हाला मुजरे करायला लागतात आणि काँग्रेसवाले तरीही ढुंकून सुद्धा तुमच्याकडे बघत नाहीत. एका एका उमेदवारीसाठी तुम्हाला नाक रगडायला लागते.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उबाठा व संजय राऊत यांच्यावर केली.
काँग्रेसवाल्यानी अक्षरशा तुमच्या नाकातून रक्त काढलेले आहे. तुम्हाला किती उमेदवारीच्या सीट द्यायच्या कशा, सीट द्यायच्या ह्याच्यावर जे काय काँग्रेसवाले तुमच्यासमोर डोळे वटारून दाखवत आहेत आणि त्याच्या समोर जे तुमची काय चालत नाही ना, त्या संदर्भात पहिले आपल थोबाड उघड आणि मग अन्य लोकांवर टीका टिपणी करण्याची हिंमत कर, असे संजय राऊत यांना आमदार नितेश राणे यांनी सुनावले आहे.
त्याग आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच नाही. त्यागाचे महत्व संजय राजाराम राऊतला समजणार नाही. हिंदुत्व या विषयावर तडजोड करण्यापलीकडे ह्यांनी काही केले नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जो काही त्याग केला आहे तॊ ह्याच्या सारख्या टीनपाट माणसाला समजणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर ठेवणाऱ्या भ्रष्ठाचारी संजय राऊत माणसाला त्याग काय असतो ते कळणार नाही, अशी टीका आमदार राणे यांनी केली.
संजय राऊतच्या स्वप्नात पण हिंदूंचा गब्बर येतो, म्हणून त्याची आई बोलते झोप नाय तर हिंदूचा गब्बर येईल.असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. याच्या सारख्या औरंग्याच्या नाजायज औलाद्यांकडून आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र नको आहे. आमचे रक्त भगवे आहे. तुमच्या सारखे हिरवे नाही.अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी जहाल टीका केली आहे.