हमास-इस्रायल यांच्यातील युद्ध अखेर थांबले

0

वॉशिंग्टन : इस्रायल आणि हमास या दोन्ही देशांमध्ये १५ महिन्यांपासून युद्ध सुरू होतं. आता यांच्यातील युद्ध अखेर थांबले आहे. मंगळवारी दोन्ही देशांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आपली सहमती दर्शवली असून युद्धविरामाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत युद्ध थांबल्याची माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबल्यानंतर हमास गाझामध्ये बंदी असणाऱ्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात येईल, त्या बदल्यात इस्रायल हमासच्या लोकांनाही सोडणार आहे.

युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्यात हमासने मान्य केले आहे की, महिलांप्रमाणेच लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना प्रथम मुक्त केले जाईल.पहिल्या टप्प्यात हमास इस्राइलच्या ३३ कैद्यांची सुटका करेल, तर इस्रायल २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. १५ दिवसानंतर हमास उर्वरित कैद्यांची सुटका करणार आहे. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल यांच्या मध्यस्थीमुळे हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला पुर्णविराम लागलाय. कतारच्या पंतप्रधानांनी गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेले विनाशकारी युद्ध संपविण्याची घोषणा केली आहे. अनेक इस्रायली ओलीसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम कराराची घोषणाही त्यांनी केली.

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविरामाची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डानाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्यांनी आपल्या सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटलेय की, आम्ही मध्यपूर्वेतील ओलिसांसाठी करार केला आहे. त्याला लवकरच सोडण्यात येणार आहे. धन्यवाद! IDF (इस्रायल डिफेन्स फोर्स) ने ओलिसांच्या परत येण्याला ‘विंग्स ऑफ फ्रीडम’ असे नाव दिले आहे. दोन्ही देशांमध्ये मागील १५ महिन्यापासून युद्ध सुरू होतं. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या सर्वाधिक होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech