संयुक्त राष्ट्रसंघाने राफाहमधील अन्नधान्याची मदत थांबवली

0

राफाह – संयुक्त राष्ट्रसंघाने राफा शहरात सुरु ठेवलेली अन्नधान्याची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नपुरवठ्यातील अडचणी व सुरक्षेच्या भीती व शरणार्थींची कमी झालेली संख्या यामुळे हा पुरवठा थांबवण्यात आल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्नपुरवठा संस्थेने दिली आहे.

इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे अन्नसुरक्षा कार्यक्रमाची गोदामे धोक्यात आली असून तिथून पुरवठा करणे अशक्य झाले आहे. सध्या राफाह शहरातील ८ लाख १० हजार शरणार्थीं इथून निघून गेले असून गेल्या १० दिवसांपासून या भागात वैद्यकीय मदतही आली नसल्याची माहितीही संस्थेने दिली आहे. अमेरिकेनेही आपण पुरवलेली ५६९ टनाची अन्नाची मदत पोहोचली नसल्याची शंका व्यक्त केली होती. शनिवारी दायर अल बालाह या शहरात उद्विग्न झालेल्या पॅलेस्टिनी लोकांनी मदत कार्यक्रमाचे गोदामांकडे जाणारे अन्न वाहून नेणारे ट्रक लुटले होते. त्यानंतर हा अन्न पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अन्नपुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला असून मदत पाठवण्यासाठी नवे मार्ग उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वितरण पुन्हा सुरु केले जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech