आवक वाढताच हरभऱ्याच्या भावात पुन्हा घसरण

0

मुंबई – या वर्षी हरभऱ्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात कापसाचे भावदेखील कमी झाले आहेत. हरभऱ्याच्या दारात पुन्हा घसरण झाली आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५,४४० रुपये आहे. हरभऱ्याच्या किमती गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यानी घसरून ५,६५० रुपयांवर आल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यापासून हरभऱ्याचे भाव सतत घसरत आहेत. रबी पिकांपैकी हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे. हरभऱ्याच्या दरात सतत घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गेल्या आठवड्यात हळदीच्या किमती ७.३ टक्क्यानी वाढून १६,५३३ रुपयावर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १६,५२८ रुपयांवर आल्या आहेत. तुरीची किंमत गेल्या सप्ताहात ९,५६५ रुपयांवर आली होती. या सप्ताहात ती २.२ टक्क्यांनी वाढून ९,७७५ रुपयांवर आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech