हळदीला सोन्याचा भाव बियाणे दरात दुप्पटीहून वाढ

0

सांगली – हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीची लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले आहे . त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झाली. आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३,५०० रूपये असलेला दर यंदा ८,४०० रूपये क्विंटलवर पोहोचला आहे.

अक्षयतृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची धामधूम सुरू होते. हळदीला यंदा क्विंटलला सरासरी १७,५०० रूपयांचा दर मिळाला आहे . यामुळे यंदा हळद लागवड वाढण्याची शक्यता गृहित धरून हळदीचे सुमारे २०० ते २५० टन बियाणे सेलमहून मागविण्यात आले आहे. गेल्यावर्षी हळद बियाणाचा दर तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्विंटल होता. यंदा मात्र, हळदीचे बियाणेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. कारण हळदीला चांगला दर मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांनी हळदीचे बियाणे मोडले असल्याने बाजारात अथवा खासगी शेतकर्‍यांकडे हळदीचे बियाणे अल्प प्रमाणात आहे. यंदा बियाणे अल्प असले तरी गतवर्षाच्या अल्प पावसामुळे हळद लागवडीचे प्रमाण कमी राहण्याचीच शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech