अकोला : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने ११ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उदघाट्न शनिवारी थाटात पार पडले. राष्ट्रसंतांचा विचार जनसामान्यांच्या भाषेत सांगितलेले तत्त्वज्ञान होय. राष्ट्रसंतांनी कर्मकांड नाकारले, विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी साहित्य लिहिले. धर्माच्या नावाखाली होणारे सामान्यांचे शोषण थांबावे हाच विचाराचा धागा घेऊन राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली. हाच विचार वारकरी संप्रदायाने सुद्धा जोपासला आहे, मात्र अलीकडच्या काळात काही जण आपल्या सोयीने कर्मकांड सांगून वारकरी संप्रदाय बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी व समाजाच्या कल्याणासाठी वारकरी संप्रदाय व राष्ट्रसंतांच्या प्रचारकांनी हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात केले.
यावेळी विचार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक शामसुंदर सोन्नर हे होते. तर स्वागताध्यक्ष मंगेश कराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत जावेदजी पाशा, विचार साहित्य संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, ग्रामगीताचार्य डॉ. भास्करराव विघे गुरुजी, ग्रामगिता प्रचारक ज्ञानेश्वरजी रक्षक, प्रभात किड्स चे संचालक डॉ. गजानन नारे, सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे, जेष्ठ गुरुदेव प्रचारक नामदेवरावजी गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते कपिल ढोके, सेवा समिती चे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, उद्योजक अरविंद देठे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामगिता जीवन गौरव पुरस्काराचे थाटात वितरण
या संमेलनात भजनसम्राट स्व. रामभाऊजी गाडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा मानाचा ग्रामगिता जीवन गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना शामाताई दहिवाड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गोपाल गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनाच्या यश्वितेसाठी गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकारकर, मयूर वानखडे, प्रसाद बरगट, सुशांत नीलखन, अंकुश मानकर, पवन गुल्हाने, रामेश्वर लोथे, प्रज्वल गुल्हाने, ओम गुंजरकर, निलेश मोहोकार, प्रल्हाद निखाडे, शिवा महल्ले आदी सह सेवा समितीच्या पदाधिकारी यानी परिश्रम घेतले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने ११ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उदघाट्न शनिवारी थाटात पार पडले.