फेसाळलेला माळशेज पर्यटकांना घालतोय भुरळ…!

0

फेसाळलेला माळशेज पर्यटकांना घालतोय भुरळ, परंतु “सावधान” एकबाजूला दरडीकोसळण्याची भिती, बेदरकार वाहनचालकाकडून चिरडण्याची दाटशक्यता, तर प्रंसग पडला तर तुमच्या मदतीसाठी कोणी ही नसल्याने आपल्या जबाबदारीवर आनंद लुटा, कल्याण पासून घाटमाथ्या पर्यत राष्ट्रीयमहामार्ग पोलिस वाटमारीत व्यस्त…!

मुरबाड – माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात सहलीचा आनंद लुटता येणारं निसर्गरम्य ठिकाण होय, जागोजागी फेसाळलेल्या धबधब्यातं चिंबभिजण्याचा आनंद घेता येणार ठाणे जिल्हयातील एकमेव रम्य ठिकाण. पर्यटकांना निसर्गप्रेमीना, कौंटूबिक जिव्हाळा जोपासणा-यांना प्रेमीयुगुलांना मित्रपरिवारांना निसर्गसौदयाचा मनमुराद आनंद देणारा माळशेज घाट सध्या साद घालु लागला आहे.

मुंबई पासून १५० किमी अंतरावरील कल्याण- मुरबाड -माळशेज हायवे वरील हे “वन डे” सहलीचा आनंद लुटता येणार ठिकाण आहे. या रस्त्यावर टोकावडे पासून घाटमाथ्या पर्यत जागो जागी स्थानिक अदिवासी कडून आयुर्वैदिक अशा राणभाज्या विकल्या जातात, असाध्यअशा अनेक रोगावर या भाज्यांचा उपयोग होतो.  रानमेवा, शेवळे, करवंदे,मध, काटेरी कंटूळी सह अनेक वस्तु मुबलक व स्वस्तात मिळतात, त्या कडून आपण ह्या वस्तु खरेदी केल्यातर त्यांना देखील रोजगार मिळतो, जागोजागी टपरीवर सुशिक्षीत तरूणाकडून बाफाळलेल्या भुंईमुंगाच्या शेंगा, भाजलेली कणस, चविदार पाणभजी “वडा” घरगुती भाकरी पिठल, मिरर्चीचा ठेसा, सोबत लज्जतदार चहा आनंद या घाटात लुटता येतो.

माळशेज हायवे हा रस्ता तसाही मृत्यूचा सापळा म्हणूनच ओळखला जातोय, सावर्णे गावा पासून हा घाट सुरू होतो किमा़न १० किमी च्या या रस्त्यावर कायम धोकादायक तुटलेल्या संरक्षण भिंती दिशादर्शक फलक गायब झालेल संध्याकाळ झाली दाटधुक्याची चादरओढलेली , रात्रीच्या वेळेस केवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या रंगित पट्टयाचा काय वाहन चालकांना तो आधार, दरडी, दगड,खराळ, मुरबा, कोसळण्याची दाट शक्यता असलेला व बेदरकार पणे वाहन चालक त्यात खाजगी ट्रकवाले,कोंबड्याची वाहतुक करणारे व या वर कळस म्हणजे बसचालक हे कधी घाटात कुणाचा बळी घेतील हे सांगता येत नाही.

नुकताच या घाटात निसर्गसौदर्याचा आनंद लुटावयास आलेले सांताक्रृस सेथील रोहित डिंगणकर(२४)नंदिनी मयागडे (२३)यांच्य दुचाकीला एस् टी बस ने धडक दिल्याने दोघांचा बळी गेल्याची घटना घडली आहे, कल्याण पासून माळशेजघाटातील तमाम पोलिस चौक्या, महामार्ग हायवे वाटमारी पथक तैनात असले तरी, या घाटात दु्र्घटना घडली तर आपल्या मदतीसाठी कोणी वेळेवर कोणी ही उपलब्ध रहात नसल्याने आपली सुरक्षीतता आपणस पारपाडली पाहिजे याच भान ठेऊन वन डे सहलीचा आनंद लुटण्यासाठी माळशेज साऱख ठिकाण शोधून सापडणार नाहीच….!

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech