मुंबई – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी २८ मार्चला जाहीर होणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. उद्या शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील बॅलार्ड इस्टेट इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, शरद पवार गटाची पहिली यादी परवा जाहीर होणार आहे. शरद पवार गट १० जागांवर लढणार आहे. तसेच भिवंडीच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही आहे.