देवगड हापूसची पहिली पेटी सांगलीला दाखल !

0

देवगड :  कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला पाठविल्या आहेत. देवगड हापूसच्या एक डझनच्या या एका पेटीला २५०० रुपये इतका दर मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी त्यांनी एक एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी यांच्या पेढीवर पाठविल्या असून यातील एका डझनच्या पेटीला २५०० असे दोन हापूसच्या पेटींना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचे धुरी यांनी सांगितले.

कुणकेश्वर-वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंच्या बागेतील हापूस आंब्याच्या झाडांना श्रावण महिन्यापासून मोहोर येऊ लागला होता. हवामानाच्या बदलामुळे हा मोहोर गळून देखील बर्‍याचवेळा पडला. मात्र आलेला मोहोर टिकवण्यासाठी या दोन बंधूंची धडपड सुरू होती, यात त्यांना यशही आले. त्यांनी आपल्या बागेतील मोहोर टिकावा यासाठी नियोजनपूर्वक कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पीक जपण्याचा प्रयत्न केला. यातूनच या हंगामातील देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठविण्याचा मान या धुरी बंधूंना मिळाला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech