संजय केळकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज

0

ठाणे – ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांचा उमेदवारी अर्ज उद्या सोमवारी (ता. २८) दाखल करण्यात येणार आहे. घंटाळी देवी मंदिरापासून सुरू होणाऱ्या भव्य मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी आज येथे दिली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केळकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली असून, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आमदार संजय केळकर यांच्याकडून सोमवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घंटाळी देवी मंदिरापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात होईल. या वेळी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वाघुले यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech