ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

0

जिल्हा परिषदेचे एकूण 19 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त

ठाणे –  ठाणे जिल्हयात जुलै महिन्यात जिल्हा परिषदेचे एकूण 19 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. आहे या अनुषंगाने जुलै महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते 19 अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌ जिल्हा परिषद ठाणे च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात आल्याने सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची उमंग निर्माण झाली.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विकासासाठी प्रदिर्घ काळ प्रशासकीय कामकाजात मोलाचा वाटा अधिकारी व कर्मचारी यांनी दिला आहे याबाबत त्यांचे पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विस्तार अधिकारी (शिक्षण) शुभांगी पाठारी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बोलतांना पाठारी यांनी सांगितले की गेली 40 वर्षे ठाणे ग्रामीण भागात काम करून आज सेवानिवृत्त होताना आनंद होत आहे. हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मोलाचे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर, पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) किर्ती डोईजोडे तसेच सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षण विभाग प्राथमिक 16, सामान्य प्रशासन 02, आरोग्य विभाग 01, असे जिल्हा परिषदेचे एकूण 19 अधिकारी व कर्मचारी जुलै महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. सहाय्यक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, आरोग्य सेवक, शिपाई या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech