शिवाजी पार्कवर घुमणार ठाकरेंचा आवाज

0

मुंबई – शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला मोठे महत्त्व आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दसरा मेळाव्यातून आपल्या पक्षाच्या राजकारणाची संभाव्य दिशा स्पष्ट करत असत. या दसरा मेळाव्यात त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ले चढवले. चार दशकांचा काळ, एक नेता आणि एकाच मैदानावर पार पडत असलेली सभा म्हणून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा विक्रम आहे.

शिवसेनेच्या इतिहासात दसरा मेळाव्याला चांगलेच महत्त्व आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाकरेसोबतच शिंदे गटही दसरा मेळावा घेऊ लागला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोणाचा दसरा मेळावा होणार, यावर दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र आज, ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.

मागील दोन वर्षांपासून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट मैदानाच्या परवानगीवरून आमने-सामने आले होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठी चांगलीच कंबर कसली होती. तर ठाकरे गटानेही जोर लावला होता. मागील वर्षीदेखील ठाकरे आणि शिंदे गटात मैदानाच्या परवानगीवरून चांगलीच चुरस लागली होती. मात्र, शिंदे गटाने आपला दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर घेतला.

दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने चांगलीच तयारी केली होती. काही महिने आधीच ठाकरे गटाने मैदानाची मागणी करणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले होते. मात्र, महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नव्हता. मैदानाच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेला स्मरण पत्र पाठवले होते. अखेर आज ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे यंदा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech