मुंबई -दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई विजयी ठरले आहेत. तर शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ठाकरेंनी मुंबईत पहिला विजय मिळवला आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती. आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे ठाकरें विरूद्द शिंदे अशी लढत या मतदार संघात होता. अखेर आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल देसाई विजयी ठरले आहेत. तर शिंदेंचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव झाला आहे.