पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव

0

कॅनबेरा : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारताविरुद्ध पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात दणक्यात पुनरागमन केले. पहिल्या डावात भारतीय संघाला १८० धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलिया संघाने ट्रॅविस हेडच्या शतकी खेळीच्या जारोवर ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ कमबॅक करेल, अशी आशा होती. पण आघाडीच्या फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाला १९ धावांचेच लक्ष्य देता आले होते. जे त्यांनी १० विकेट्स राखून पार केले. म्हणजेच हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ३.२ षटकातच पूर्ण केले. आणि तिसऱ्या दिवशीच कसोटी संपवली. भारतीय संघानं या सामन्यात दोन्ही डावात मिळून ८१ षटकात २० विकेट्स गमावल्या. नितिशकुमार रेड्डी दोन्ही डावात संघाकडून सर्वाधिक धावा केल्या.ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर नॅथन मॅकस्विनी (१०) आणि उस्मान ख्वाजा (९) नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियाने ऍडलेडला झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात अडीच दिवसातच भारताविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला. भारतीय संघाला तिसऱ्या दिवशीच पराभूत करत ऑस्ट्रेलियानं ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

या सामन्यात भारताचा संघ पहिल्या डावात १८० धावांवरच सर्वबाद झाला होता. भारताकडून पहिल्या डावात देखील नितीश रेड्डी यानेच सर्वाधिक ४२ धावा केल्या होत्या.त्याच्याशिवाय केएल राहुल (३७) आणि शुभमन गिल (३१) यांनीच ३० धावांचा टप्पा पार केला होता. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ३३७ धावा केल्या. त्यामुळे त्यांना १५७ धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १४१ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकारांसह १४० धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅबुशेनने ६४ धावांची खेळी केली. याशिवाय नॅथन मॅकस्विनीने ३९ धावा केल्या.भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. नितीश रेड्डी आणि आर अश्विन यांनी १-१ विकेट घेतली.आता या मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनला सुरू होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech