टीडीपीला हवे लोकसभा अध्यक्षपद

0

नवी दिल्ली – केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर मोदी सरकारने आपले काम सुरु केले आहे. दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आपल्याकडेच कशी ठेवता येईल यासाठी भाजपा रणनिती आखण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहे. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी संसदीय अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. याला जेपी नड्डा, आश्विनी वैष्णव, किरन रिजिजू, लल्लन सिंह, चिराग पासवान आदी हजर होते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाने सभापतीपदासाठी एनडीएला पाठिंबा देण्याचे उघडपणे मान्य केले आहे. परंतू टीडीपीने आपले पत्ते खोललेले नाहीत. यामुळे भाजप टेंशनमध्ये असून टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद पाहिजे असा कयास लावला जात आहे.

१८ व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक झाली. बैठकीत सभापती आणि उपसभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवारासह विरोधी पक्षातील घटक पक्षांना आपल्याबाजुने करण्यासाठी कशी रणनिती आखता येईल यावर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपासाठी लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवणे खूप महत्वाचे आहे. एनडीएसाठी हे पद जिंकणे कमी जिकीरीचे नाही आहे. गेल्या सरकारमध्ये ओम बिर्ला यांनी अध्यक्षपद सांभाळले होते. परंतू यावेळी कोणाची वर्णी लागेल हे अद्याप एनडीएला ठरविता आलेले नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech