लंडन – ब्रिटनची सार्वत्रिक निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. अशातच पंतप्रधान ह्रषि सूनक यांची महागडी बॅग आता विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा बनला आहे. सूनक यांनी नुकतीच कॉर्नवॉलला भेट दिली. हा भाग ब्रिटनमधील सर्वात गरीब अशा भागांमध्ये गणला जातो. कॉर्नवॉल भेटीवर असताना सूनक यांच्याकडे महागडी टमी बॅग होती. बॅगेवर आरएस अशी सूनक यांच्या नावाची आद्याक्षरे कोरलेली होती.या बॅगेची किंमत ७५० पौंड म्हणजे ७९ हजार ४०० रुपये असल्याचे सांगितले जाते. एवढी महागडी बॅग घेऊन सूनक गरिबांच्या वस्तीत गेले हाच विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा बनवला.
दरम्यान, संडे टाईम्सने जाहीर केलेल्या ब्रिटनमधील अतिश्रीमंतांच्या यादीत पंतप्रधान सूनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची एकत्रित मालमत्ता प्रिन्स चार्ल्स यांच्यापेक्षाही जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. तोच संदर्भ देत विरोधकांनी सूनक यांच्या श्रीमंतीवर निशाणा साधला आहे.