अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार लाईव्ह ट्रेडिंग सत्र

0

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार सुरू राहणार आहे. भारतीय शेअर बाजार निर्देशांक (एनएसई) आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक (बीएसई) नियमीत वेळेनुसार सुरू राहणार आहेत. साधारणतः शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतात. परंतु, अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार असूनही बाजार नियमित वेळेनुसार लाईव्ह ट्रेडिंग सत्र करणार आहेत. यासंदर्भात एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या दिवशी 1 फेब्रुवारी 2025 रोजी थेट ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल. सेटलमेंटच्या सुट्टीमुळे 1 फेब्रुवारी 2025 रोजी ‘T0’ सत्र ट्रेडिंगसाठी शेड्यूल केले जाणार नसल्याचे एनएसईने नमूद केले आहे. इक्विटी मार्केटमध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत नियमित ट्रेडिंग सत्र असणार आहे. तर कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सत्र असेल. अर्थसंकल्पातील घोषणांवर गुंतवणूकदारांकडून वेळेवर प्रतिसाद मिळणे, हा यामागील उद्देश आहे.

यपूर्वी देखील अशा हाय- इम्पॅक्ट इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार खुला ठेवण्यात आला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2020 आणि 2015 मध्ये देखील शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला होता आणि तेव्हा देखील ट्रेडिंग सत्र आयोजित करण्यात आले होते. अर्थसंकल्पाचा दिवस हा शेअर बाजारासाठीदेखील महत्त्वाचा मानला जातो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पातून सरकारची आर्थिक धोरणे, कर आकारणी आणि क्षेत्रनिहाय निधीच्या वाटपाची रूपरेषा जाहीर केली जाते. याचा उद्योग आणि गुंतवणूकदारांच्या भावनांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचे हे सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादरीकरण असेल. अर्थमंत्री आणि त्यांच्या टीमने अर्थसंकल्प 2025 ची तयारी सुरु केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech